किंग्जस्टन । वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-1 असा दिमाखदार विजय मिळवला. मात्र ही मालिका जिंकूनही भारताच्या खात्यातले 2 गुण कमी झाले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर आयसीसीने जाहिरकेलेल्या आकडेवारीत भारताला त्याचा फटका बसला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारताच्या खात्यात 116 गुण जमा होते. मात्र आता भारताचे 2 गुण कमी होऊन, 114 गुणांसह भारत तिसर्या स्थानावर कायम राहिला आहे.
वेस्ट इंडिजच्या संघाने चौथ्या वन-डे सामन्यात भारताचा पराभव केल्यामुळे भारताला या 2 गुणांवर पाणी सोडावं लागले. या घरसणीमुळे जागतिक क्रमवारीत पहिल्या दोन स्थानावर येण्याचा भारताचा मनसुबा धुळीला मिळाला आहे. नुकत्यात जाहीर झालेल्या आकडेवारीनुसरा दक्षिण आफ्रिकेचा संघ 119 गुणांसह पहिल्या तर ऑस्ट्रेलियाचा संघ 117 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. भारत आपली आगामी एकदिवसीय मालिका श्रीलंका दौर्यात खेळणार आहे. त्याआधी विंडिज दौर्यात आपला एकमेव टी-20 सामना खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत भारताकडून अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने शतक झळकावले. तर संपूर्ण मालिकेत अजिंक्य रहाणेने तडाखेबाज फलंदाजी करत धावांचा रतिब घातला होता. व तो मालिकावीर ठरला होता.
आयसीसीची क्रमवारी : दक्शिण आफ्रिका (119), ऑस्ट्रेलिया (117), भारत (114), इंग्लंड (113), न्यूझीलंड (111), पाकिस्तान (95), बांगलादेश (94), श्रीलंका (92), वेस्ट इंडिज (78), अफगणीस्तान (54).