मालेगावची धुरा काँग्रेसच्या हाती

0

मालेगाव – मालेगाव महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. भिवंडीपाठोपाठ मालेगावमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेने युती केल्याने येथे काँग्रेसचे महापौर रशीद शेख तर शिवसेनेचे महापौर सखाराम घोडके हे विराजमान झाले. विशेष म्हणजे महापालिका स्थापनेनंतर शिवसेनेला प्रथमच उपमहापौरपदाचा मान मिळाला आहे.मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती.

काँग्रेसला सर्वाधिक 28 तर राष्ट्रवादी-जनता दल युतीला 26 जागा मिळाल्या होत्या.काँग्रेस-राष्ट्रवादीची युती व्हावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही, अशा वेळी शहर विकासाच्या मुद्यावर काँग्रेस-शिवसेना एकत्रित होऊन सत्ता स्थापनाचा दावा केला. मात्र, काँग्रेसचे 28 आणि शिवसेनेचे 13 सदस्य एकत्रित होऊन ही बहुमत पूर्ण होत नसल्याने अखेर काँग्रेसने एमआयएमबरोबर बोलणी केल्याने त्यांच्या सात सदस्यांनी महापौर-उपमहापौर निवडणुकीत तटस्थाची भूमिका घेतल्याने बहुमत पूर्ण नसतांनाही काँग्रेस आणि शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौर निवडून आले.

निवडणूक प्रक्रिया

महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु होताच राष्ट्रवादी-भाजपा युतीचे दोन सदस्य सभागृहात अनुपस्थित राहिले. त्यामुळे राष्ट्रवादी-भाजपाच्या नबी अहमद अहमदुल्ला यांना 34 मतं मिळाली तर महापौर रशिद शेख यांना 41 मतं मिळवून ते निवडणूक आल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जाहीर केले. उपमहापौर निवडणुकीत मात्र एमआयएम प्रमाणे भाजपाचे 7 सदस्य तटस्थ राहिल्याने शिवसेनेचे सखाराख घोडके यांना 41 तर राष्ट्रवादी-भाजपाचे अन्सारी मसूद अहमद यांना केवळ 27 मतं मिळाली.

अतिक्रम ठरणार लक्ष्य

महापौर-उपमहापौर निवडीची घोषणा होताच सर्वांनी त्यांच स्वागत केले. नूतन सभागृहात अनेक जुने सदस्य पुन्हा निवडून आले असून सर्वांना सोबत घेऊन आपण महापालिकेचे कामकाज करु त्याच प्रमाणे सर्व प्रथम मुख्य रस्त्यांवरील अतिक्रम काढणार असल्याची प्रतिक्रीया नवनिर्वाचीत महापौर  रशिद शेख यांनी व्यक्त केली.

निवडणूकीची पार्श्‍वभूमी

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात विजय मिळवल्यानंतर मालेगावसारख्या मुस्लिमबहुल भागातही भाजपने पुन्हा मुस्लिम कार्ड टाकले होते. पण, नागरिकांनी साफ नकार देत चौथ्या वर्षांत पदार्पण करणार्‍या भाजप सरकारला धुडकावले होते. मालेगावमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्यामुळे मालेगावावर काँग्रसने आपला वरदहस्त कायम ठेवला गेला. तर राष्ट्रवादी दुसर्‍या स्थानावर होती. मात्र, कुणाच्याही हाती एकहाती सत्ता येणार याबाबत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता काँग्रेस आणि शिवसेनेत युती झाली असून काँग्रेसचे रशीद शेख हे मालेगावच्या उपमहापौराची धुरा सांभाळणार आहेत.