रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता ; शिकारींचा होणार उलगडा
पाचोरा- वनप्राण्यांची शिकार करून शिकारी चारचाकी वाहनातून पसार होण्यापूर्वी पाचोरा पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. सोमवारी आरोपींना अटक केल्यानंतर मंगळवारी पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींच्या अटकेतील शिकारींचा उलगडा होणार असून या प्रकारात काही अन्य संशयीत सहभागी असल्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.
अट्टल शिकारींना कोठडी
पाचोरा पोलिसांनी वहिइदू यासीन, महंम्मद जफर हसन , आरीफ अहमद, शहेजाद इकबाल, रशीद अहमद, जमील अहमद, शेख शकूर (सर्व मालेगाव) या सात शिकार्यांना अटक केली होती तर त्यांच्याकडील बारा बोअरची बंदूक, पाच वापरलेली तर 16 जिवंत काडतुसे, सर्च लाईट, तीन सुरे व दोन कुर्हाडी जप्त करीत चारचाकी सुमो (एम.एच.15 बीडब्ल्यू 5423) व त्यातील 195 किलो नीलगायीचे मांस जप्त केले होते. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.