मालेगावातील भाजपा पदाधिकार्‍याच्या अड्ड्यावर छापा ; 24 जुगारी जाळ्यात

0

अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची धडाकेबाज कारवाई ; एक लाख 90 हजारांच्या रोकडसह 10 दुचाकी, रीक्षासह सात लाख 82 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक- मालेगाव शहरातील सटाणा नाका भागातील एकता जिमखान्याला लागून असलेल्या भाजपाच्या माजी महानगर जिल्हाप्रमुखाच्या जुगार अड्ड्यावर मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या विशेष पथकाने छापा टाकून 24 जुगार्‍यांना अटक केली. जुगार अड्डा मालक सुनील गायकवाड पसार असून पोलिसांनी घटनास्थळावरून एक लाख 90 हजारांच्या रोकडसह 10 दुचाकी, रीक्षासह सात लाख 82 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मालेगाव छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक आरती सिंघ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार त्यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वांगडे, हवालदार देविदास ठोके, अभिमन्यु भिलावे, दिनेश पवार, शरद देवरे, महारु माळी, सुभाष निकम, पंकज गुंजाळ, राहुल आहेर, रंजीत साळुंखे, समाधान सानप आदींच्या पथकाने छापा टाकला.

यांचा अटकेतील आरोपींमध्ये समावेश
जुनेद अहमद रफीक, शेख सईद शेख बशीर, मनोज रमेश शेलार,) सैयद लाल सैयद नबी, बापू गुलाब खैरनार, मोहन हरी पवार, संजय कैलास गंगावने, मॅनेजर राकेश आनंदा शिंदे, प्रकाश तुकाराम पाटील, रोहिदास अशोक लोंढे, राजेंद्र शंकर यशोद, अनिल तुकाराम पगार, अनिल बाबूलाल गायकवाड, दत्तात्रय चीलू अमृतकर, शेख शरीब शेख अब्बास, अखिल शहा सरदार, मोहम्मद शाबान गुलाल, शेख अनिस शेख रशीद, अनिल बालकृष्ण पिंगळे, प्रशांत कलाचंद भावसार, नंदू रामदास पाटील, किशोर अशोक जाधव, सुभाष यशवंत अहिरे, अजीज नूर मोहम्मद अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जुगार अड्ड्याचा मालक सुनील बाबूलाल गायकवाड पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक लाख 90 हजार 390 रुपयांची रोकड तसेच दहा दुचाकी व एक रीक्षा तसेच 25 मोबाईल मिळून सात लाख 82 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.