मालेगावात कोरोनाचा कहर

0

मालेगाव– मालेगावात नव्याने ३७ करोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण करोना बाधितांची संख्या आता ३२५ झाली आहे. आज १२८ अहवाल प्राप्त झाले त्यात ९१ नकारात्मक आले असून ३७ अहवाल सकारात्मक आहेत. या सकारात्मक अहवालांमध्ये दहा अहवाल हे जुन्या रुग्णांच्या दुसर्‍यांदा केलेल्या चाचणीचे आहेत.

महाराष्ट्रात ७९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर मागील चोवीस तासात ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५२१ रुग्णांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. आज महाराष्ट्रात १२१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रातील २ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. दरम्यान मुंबई, पुण्यापाठोपाठ आता औरंगाबाद व मालेगावमध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची डोकंदुखी वाढत आहे. औरंगाबादमध्ये काल ४० नवे करोनाबाधित सापडल्यानंतर आज पुन्हा १७ नवे करोनाबाधित सापडल्याने औरंगाबादमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या २७३वर पोहोचली आहे.