मालेगाव : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत मुस्लिमबहुल भागात विजय मिळवल्यानंतर मालेगाव सारख्या मुस्लिमबहुल भागातही भाजपने पुन्हा मुस्लिम कार्ड टाकले आहे. पण, मतदारराजाने साफ धुडकावून लावत चौथ्या वर्षांत पदार्पण करणार्या भाजप सरकारला धुडकावले आहे. मालेगावमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून मालेगावावर काँग्रसने आपला वरदहस्त कायम ठेवला आहे. तर राष्ट्रवादी दुसर्या स्थानावर आहे. मात्र, कुणाच्याही हाती एकहाती सत्ता न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे.
मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी आज मतमोजणी पार पडली. एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर 83 जागांवर कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि भाजप अशी तिहेरी लढत पाहण्यास मिळाली. सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर काँग्रेसने आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम ठेवली. काँग्रेसने सर्वाधिक 28 जागा पटकावल्या आहे. 28 जागा जिंकत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादीने 20 जागा जिंकत दुसरे स्थान मिळवले. शिवसेनेनं 13 जागा जिंकत तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. तर भाजप चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. भाजपला 9 जागा मिळाल्या, तर एमआयएमला 7 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
विशेष म्हणजे हिंदूत्वाचा अजेंडा राबवणार्या भाजपने मुस्लिमबहुल भागात उमेदवारांना तिकिटांचं वाटप केलं होतं. एकूण 27 मुस्लिम उमेदवारांनी तिकिटांचं वाटप केलं होतं. यात 16 महिलांचा समावेश होता. परंतु, भाजपने खेळलेलं मुस्लिम कार्ड सपेशल अपयशी ठरलं. मतदारराजाने भाजपची रणनीती उधळवून लावली. विशेष म्हणजे भाजपने 56 उमेदवार दिले होते. त्यापैकी फक्त 9 उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसने सर्वाधिक 76 उमेदवार दिले होते. एमआयएमने यावेळी मालेगाव निवडणुकीत उडी घेत 35 उमेदवार दिले होते. मात्र, त्यापैकी फक्त 7 चं उमेदवार विजयी झाले.
मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसच्या पारड्यात फक्त 3 जागा आणखी मिळाल्यात. तर राष्ट्रवादीच्या 2 जागा घटल्या अशून 22 वरून 20 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने मागील निवडणुकीत भोपळाही फोडला नव्हता. मात्र यावेळी 9 जागा जिंकल्यात. तर मागील निवडणुकीत 2 जागा जिंकणार्या मनसेला यंदा भोपळाही फोडता आला नाही. हिंदुत्त्व आणि मुस्लिम कार्ड खेळणार्या राजकीय पक्षांना एकहाती सत्ता न देत मतदारराजाने सत्तेसाठी या पक्षांच्या पायात पाय अडकवून दिले आहे.
पक्ष जागा
काँग्रेस 28
राष्ट्रवादी 26
शिवसेना 13
एमआयएम 07
भाजप 09
इतर 01