मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी

0

मुंबई । मालेगावमधील 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातील आणखी दोन आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष कोर्टाने मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. नऊ वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टाकडून लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना जामीन मंजूर केल्यानंतर आता आरोपी सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर द्विवेदी यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

लेफ्ट. कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांचा जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर सुधाकर चतुर्वेदी आणि सुधाकर धरद्विवेदी यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टात अर्ज केला होता. यावर कोर्टाने दोघांना हमीपत्रासह व्यक्तीगत पाच लाखांच्या बाँडवर जामीन मंजूर केला आहे.