मालेगाव येथुन आलेल्या ६ संशयितांना जळगाव हलवले

0

चाळीसगाव/ जळगाव :- मालेगाव येथून आलेल्या ६ संशयितांना चाळीसगाव येथून जळगाव हलवण्यात आले असून सर्वत्र वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहेयाबाबत माहिती घेतली असता वरील सर्व जण नात्यागोत्यातील आहेत. तर सर्वांची मालेगाव येथील बाधित मृतकाच्या दफनविधीला उपस्थिती देखील असल्याचं कळते. यात त्यांना मालेगाव येथून चाळीसगाव आणणार्‍या रिक्षा चालकासह एकाच परिवारातील ५ जण असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मालेगाव येथील मृत बाधिताचे नातलग असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली असुन तेथे दफनविधीच्या कार्यक्रमाला देखील यांची उपस्थीती होती अशी माहिती हाती आल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवीण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी सांगितले. तर खबरदारी म्हणून नगरपालिका आरोग्य अधिकारी प्रभारी मुख्याधिकारी तहसीलदार अमोल मोरे यांनी रथगल्ली आणि यांचा रहीवास असलेला कसाईवाडा देखील सील करण्यात आला असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नगरपालिका आरोग्य सभापती सायली रोशन जाधव यांचा हा प्रभाग असून त्यांनी लागलीच खबरदारी म्हणून आरोग्य विभागाला तातडीच्या उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत रथगल्ली ,कसाईवाडा, परिसर सेनेटाईज करण्यात येणार असून आजच त्यासाठी नगरपालिका कर्मचारी कामाला लागली असल्याची माहिती त्यांचे पती रोशन जाधव यांनी कळवले आहे.