मालोदच्या माहेरवासीन महिलेचे पतीसह सासरच्या मंडळीकडून आर्थिक लोभापोटी मारहाण व मानसिक छड पोलिसात गुन्हा दाखल
यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील मालोद येथील माहेरवासीन असलेल्या विवाहीतेचा सासरच्या मंडळीकडुन आर्थिक लोभापोटी मानसिक व शारीरिक छड पोलीस ठाण्यात पतीसह तिन जणां विरूध्द गुन्हा दाखल. या संदर्भात पोतीस सुत्रांकड्डन मिळालेली माहिती अशी की , दिव्या विक्की सोनवणे , वय २१ वर्ष राहणार मालोद तालुका यावल या विवाहितेस पती विक्की महेंद्र सोनवणे , नंणद सौ . मोनिका गोविंद मेढे व आजलसासु अनुसया लक्ष्मण सोनवणे सर्व राहणार कानळदा तालुका जिल्हा जळगाव यांनी मिळून दिनांक १५ / ०७ / २०२२ते २४ / ०८ / २०२३ रोजी पावेतो सासरची मंडळीने वेळोवेळी कानळदा येथे यातील संशयीत आरोपी पती विक्की सोनवणे व नंणद मोनिका मेढे यांनी मिळुन विवाहितेस माहेरून रिक्शा खरेदी साठी दोन लाख रुपये आणावे यासाठी तकादा लावत मागणी केली व विवाहीतेने पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला सासरच्या मंडळीने शिविगाळ करीत मानसिक व मारहाण करीत शारीरिक त्रास दिला, याबाबत विवाहित महिला हिने यावल पोलीस ठाण्यात दारू पिवुन मारहाण करणाऱ्या पतीसह नंणद व आजलसासु या तिघा संशयीतांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या आदेशान्वये सहाय्यक फौजदार असलम खान हे करीत आहे .