मालोद येथे 550 रुग्णांची तपासणी

0

यावल। येथील तडवी डॉक्टर्स फाउंडेशनने रविवार 16 रोजी तालुक्यातील मालोद या आदिवासी गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. त्यात 550 रुग्णांची मोफत तपासणी औषधोपचार करण्यात आले. दुसरीकडे आदिवासींकडील पशुधनाचीदेखील मोफत तपासणी झाली. या उपक्रमाचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

मालोद हे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी गाव आहे. मालोदला लागून नायगाव, इचखेडा, वाघझिरा, चिंचखेडा हे तांडे आहेत.

तडवी समाजबांधवांनी केले सहकार्य
रविवारी तडवी डॉक्टर्स फाउंडेशनने येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले. 15 तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मालोदसह पंचक्रोशीतील 550 रुग्णांची तपासणी केली. त्यात हाडांचे विकार, दंतरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग तसेच मोफत रक्ततपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांवर औषधोपचारही करण्यात आले. शिबिरासाठी स्थानिक तडवी समाजबांधवांनी सहकार्य केले.

28 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मालोदमध्ये आयोजित शिबिरात रुग्णाची तपासणी करताना तडवी डॉक्टर्स फाउंडेशनचे पदाधिकारी. याशिबिरात नेत्ररोग विभागातर्फे 28 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले, तर इतरांना चष्मेवाटप करण्यात आले. इतरही जण गंभीर आजाराचे रुग्ण असल्याचे समोर आले.