यावल:- तालुक्यातील मालोद-वाघझिरा ग्रृप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक अतिशय चुरशीची होवून हसीना सिराज तडवी यांनी बाजी मारली. त्यांच्या विरोधात थेट चार माजी सरंपचांनी ताकद लावत उभ्या केलेल्या बिस्मिल्ला तडवी यांना 13 पैकी केवळ पाच मते मिळाली तर शिवसेनेला सत्तेपासुन लांब ठेवण्यात तडवी यांना यश आले.
पेसा ग्रुप ग्रामपंचायत मालोद
तालुक्यातील पश्चिम भागातील मालोद, वाघझिरा, इचखेडा या तीन गावांसह सातपुड्यातील चिपखेडा, खालकोट, मनापूरी, आंबापाणी, रूईखेडा, साक्यादेव व माथन या सात पाड्यांचा समावेश असलेली पेसा ग्रृप ग्रामपंचायत ही मालोद आहे. एकुण 13 सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जमातीकरीता आरक्षीत होते तेव्हा सुरवातीली येथे शिवसेनेच्या रमाबाई भारसिंग बारेला या सरपंच होत्या मात्र त्यांच्या विरूध्द दिनांक 2 मे 2017 रोजी 13 पैकी उपसरपंचासह 10 जणांनी अविश्वास ठराव आणून तो पारीत केल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले होते. तेव्हापासून अपील प्रक्रीयामुळे येथील सरपंच पद हे रिक्त होते तर सोमवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात पीठासन अधिकारी तथा मंडळाधिकारी तुषार घासकडबी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रीया घेण्यात आली. त्यात माजी सरपंच बिस्मिल्ला नथ्थु तडवी यांना विद्यमान सदस्य तथा पुर्वीचे माजी सरपंच अशा चौघांची साथ होती तर त्यांच्या विरोधात हसीना सिराज तडवी यांची उमेदवारी होती. अतिशय चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत हसीना तडवी यांनी 13 पैकी आठ मते मिळवत विजय संपादन केला
या सदस्यांची होती उपस्थिती.
या सरपंच निवडीत उपसरपंच सरीता रमजान तडवीसह अरब सुबान तडवी, बिस्मिल्ला बशीर तडवी, जोहराबाई मुजाद तडवी, हुसेना अरमान तडवी, उमाबाई बिर्हाम बारेला,सुनिता नंदकिशोर पाटील, अकबर बाबु तडवी, रमाबाई भारसिंग बारेला, रूल्याबाई बारेला व संजय सुभान तडवी असे सर्व सदस्य उपस्थित होते. े