मालोद व परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 83.79 टक्के मतदान

उद्या मतमोजणी : निकालाकडे लागले दोन्ही गावातील ग्रामस्थांचे लक्ष

यावल : तालुक्यातील मालोद व परसाडे बुद्रुक या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक रविवारी झाली. दोन्ही गावात लोकनियुक्त सरपंच सह 22 सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या दोन्ही गावात सकाळी शांततेत व उत्साहात मतदान झाले. यात दोन्ही ग्रामपंचायतीत 83.79 टक्के मतदान झाले असुन सोमवारी येथील तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजेपासुन मतमोजणी होणार आहे. मालोद गावात सरपंच पदा करीता आठ उमेदवार रिंगणात असून परसाडे बुद्रुक गावात भाजपा विरूध्द काँग्रेस अशी दोन महिलांमध्ये सरळ लढत आहे.

सरपंच पदासाठी आठ जणांमध्ये चुरस
मालोद ग्रामपंचायतीच्या लोक नियुक्त सरपंच पदाकरीता 8 जणांमध्ये चुरस असुन पाच प्रभागातील 13 जागेसाठी 28 उमेदवार रिंगणात आहे तसेच परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतीत लोकनियुक्त सरपंच पदाकरीता कॉग्रेसच्या नजमा तडवी विरूध्द भाजपाच्या मीना तडवी अशी सरळ लढत आहे तर तीन प्रभागातील नऊ जागेसाठी 19 उमेदवार रिंगणात आहे. मालोद ग्रामपंचायतीच्या पाच मतदान केंद्रात 3 हजार 072 मतदारांपैकी 2 हजार 535 मतदारांनी आपला हक्क बजावल. गावात एकुण 81.20 टक्के मतदान झाल.

उद्या होणार यावलला मतमोजणी
परसाडे बुद्रुक गावात 3 मतदान केंद्रावर 1 हजार 218 मतदारांपैकी 1 हजार 060 मतदारांनी आपला हक्क बजावला या गावात 86.58 टक्के मतदान झाले दोन्ही गावात 4 हजार 290 मतदारांपैकी 3 हजार 595 मतदारांनी हक्क बजावल्याने एकूण 83.79 टक्के मतदान झाले. सोमवारी सकाळी 10 वाजे पासुन यावल तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी शेखर तडवी, एस.एल.पाटील, तलाठी समीर तडवी, टी.सी.बारेला, सुयोग पाटील यांच्या देखरेखील मतमोजणी करीत निकाल जाहीर केला जाणार आहे.