जामनेर : जिल्ह्यात श्री विसर्जनादरम्यान तिघांचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली असतानाच जामनेर तालुक्यातील माळपिंप्री येथील पाझर तलावातही दोन्ही तरुण बुडाल्याची ाबतमी समोर आली आहे. शनिवार, 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता ही दुर्दैवी घटना घडली तर चौघे मात्र सुखरूप बचावले. दरम्यान, जिल्ह्यात बुडून मयत झालेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. किशोर आत्माराम पाटील (31), नरेश संजय पाटील ( 24, दोघे रा.माळपिंपरी) अशी मयतांची नावे आहेत.
पाण्यात बुडाल्याने दोघांचा मृत्यू
किशोर व नरेश हे अन्य चार मित्रांसह श्री विसर्जनासाठी पाझर तलावात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघांचा तोल गेला तर त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे नागरिीक धावून आले. त्यांनी तत्काळ मच्छीमारांच्या सहकार्याने त्यांना बाहेर काढले मात्र तोपर्यंत उशीर झाला.
कुटूंबियांचा मन हेलावणारा आक्रोश
दोघा तरुणांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मयत घोषित केले. दोघेही तरुणांच्या कुटुंबीयांना ही बाब कळताच त्यांनी मोठा आक्रोश केला. जिल्हाभरात गेल्या दोन दिवसात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तब्बल पाच भाविकांचा मृत्यू ओढवला आहे.