निजामपूर। साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरातील निजामपुर जैताणे परिसरात पाऊस आला की वीज गायब होते. रविवारी रात्री पासुन विजपुरवठा बंद पडला. पोळा साजरा करण्यासाठी दळण दळणे दुरापास्त झाले. सोमवारी आठवडा बाजार व पोळा सण असल्याने वीजपुरवठा कधी सुरू होणार, याची प्रतिक्षा होती. संपुर्ण रात्र अंधारात काढावी लागली. सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत लाईन सुरळीत होऊ शकली नाही. पोळ्याच्या सणानिमित्त पिठाच्या गिरण्याबंद असल्याने धान्य तेथे पडून होते. विजेअभावी बँकेतुन पैसे काढणे अशक्य झाले.
आठवडेबाजार आल्याने बँकेत खुप गर्दी होती. पतसंस्थांना बँकेतुन पैसे काढता आले नाही. सर्व बँक वयवहार ठपप झाले होते. यापुर्वी भरपुर पाऊस पडला त्या वेळी असे झाले नाही व आताच वीज बंद पडलयाने आश्चर्य वयकत केले जात आहे एकंदरीत पोळा सण पावसामुळे आनंदात जाणया आड वीज बंद मुळे अडचणी चा जाणवले जैताणे वीज उपकेंद्राशी संपर्क केला असता सब सटेशनला तात्रिक बिघाड मुळे वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे तसेच बाहेरगावी दुरुस्ती टिम दुपारी 2ते 3 दरम्यान आली नंतर दुरुसती करतील