माळवाडीच्या सरपंचपदी बाळासाहेब भोंगाडे

0

तळेगाव : मावळ तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाळासाहेब भोंगाडे तर उपसरपंचपदी पूनम आल्हाट यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच गणेश दाभाडे व उपसरपंच रजनी दाभाडे यांनी राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. रिक्त पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि. 7) ग्रामपंचायतीची विशेष सभा झाली.

या सभेत सरपंचपदासाठी बाळासाहेब भोंगाडे व उपसरपंचपदासाठी पूनम आल्हाट यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तळेगाव दाभाडे येथील मंडल अधिकारी अजय सोनवणे व तलाठी भाऊसाहेब होरे यांनी ही निवड केली. गावाचा विकास साधण्यासाठी सर्वांना विश्‍वासात घेऊन व सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे यांनी प्रयत्न केले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते बजरंग जाधव, गोरख दाभाडे, संजयशेठ माळी, सुरेश शिंदे, बाळासाहेब दाभाडे, नामदेव दाभाडे, सिद्धार्थ दाभाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.