पुणे – कांदा घेऊन वाशी येथे जात असतांना माळशेज घाटातील एका वळणावर चालकाचे नियत्रंण सुटल्याने ट्रक थेट २० फुट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकमध्ये बसलेल्या ५ मजूरापैकी एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
आळेफाटा वरून वाशी येथे कांदा घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक (एम.एच.०६ क. ६०२५) मध्ये मुरबाड तालुक्यातील आळवे गाव परिसरातील काही मजूरही बसले होते. यातील रामचंद्र हिदोंळा (४५) रा. चाफेमाळवाडी याचा जागीच मृत्यु झाला. या अपघातात चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना टोकोवदे येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक मोहम्मद बाबूलाल शेख याने घटना स्थळावरुन पळ काढला आहे. तरी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे