माळी महासंघातर्फे सामूहिक विवाह

0

जळगाव । समाजातील गरीब वधुवरांना लग्नाच्या बेसुमार खर्चातून सुट मिळावी व त्यांचे शुभमंगल थाटात साजरे व्हावे या उद्देशाने खान्देश माळी महासंघाने या विनामुल्य सामूहिक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार रविवार 5 मार्च रोजी खान्देश माळी महासंघाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहा जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. वरास सफारी ड्रेस, रुमाल, टोपी, उपरणे व बूट तसेच वधूसाठी महावस्त्र, मणी मंगळसुत्र, साखळ्या, जोडवे, सॅँडल, संसारपयोगी पाच भांडी खान्देश माळी महासंघातर्फे देण्यात आली. हा विवाह सोहळा जुना नॅशनल हायवे वरील शेतकी शाळेच्या मागील संत सावता नगर येथे पार पडला. पुरोहित राहुल महाराज यांनी मंगलाष्टके म्हटली. या विवाह सोहळ्यास जिल्हाभरातून सुमारे 6 हजार समाजबांधवांनी उपस्थित होते. समाज सेवकांनी सामूहिक विवाह सोहळ्यास वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत सोहळा यशस्वी केला.

खासदार ए.टी.नाना पाटील यांची प्रमुख उपस्थिती
विवाह सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खा.ए.टी.नाना पाटील, आमदार सुरेश भोळे, माजी आमदार गुलाबराव देवकर, माजी आमदार हरिभाऊ महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेविका ज्योती इंगळे, माजी नगरसेवक किशोर भोसले, मिलिंद सपकाळे, खान्देश माळी महासंघाचे मार्गदर्शक मुरलीधर महाजन, प्रदेश अध्यक्ष प्रकाश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष संतोष इंगळे, प्रदेश सचिव वसंत पाटील, प्रदेश सहसचिव अरुण चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्याताई महाजन, जिल्हाध्यक्ष गजानन महाजन, जिल्हा उपाध्यक्ष रामू सैनी, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर रोकडे, बापू पुंजू महाजन, ज्ञानेश्वर महाजन, बन्सी आप्पा माळी, शित्तदास महाजन, कैलास सैनी, राजू लपालीकर, दिलीप महाजन, कृष्णा महाजन, अशोकभाऊ कुदळ, बाळकृष्ण महाजन, दिनेश महाजन, आदी हजर होते.

महात्मा फुले यांना अभिवादन
संत शिरोमणी सावता माळी क्रांतीसुर्य म. ज्योतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पुजन करुन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. धुळे येथून आलेले खान्देश माळी महासंघ धुळेचे विभागीय अध्यक्ष बी.बी.महाजन, धुळे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ तायडे, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष प्राचार्य एस.टी.चौधरी, धुळे जिल्हा सरचिटणीस अनिल बोरसे यांची उपस्थिती होती. अंकलेश्वर येथून महेश देवरे, पालघरचे शिक्षणाधिकारी सतिष चौधरी, बाळूमामा महाजन, भूषण महाजन, निवेदीता ताठे, सरिता नेरकर, जयश्री माळी, उपस्थित होते.

पोटजातींचे भेद मिटविण्याचे आवाहन
समाजबांधवांना मार्गदर्शन करतांना धुळे येथील बी.बी.महाजन यांनी अशा उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचे सांगितले. सर्व पोटजातींनी भेद मिटवून नवीन वाट निवडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. आमदार सुरेश भोळे यांनी अशा सोहळ्यातून समाज संघटन होत असते व त्याचीच आज गरज असल्याचे विचार व्यक्त केले. गरजू वधू-वरांना खान्देश माळी महासंघ नेहमीच मदत करीत असल्याचे मी गेल्या पाच वर्षापासून पाहत आहे, असे ते म्हणाले. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनीही आपल्या मनोगतात सामूहिक विवाह सोहळे काळाची गरज असल्याचे सांगितले. माळी समाज जागरुक झाला असून समाजाचे तरुण नेतृत्व उदयास येत आहे. ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले.

सामाजिक संघटनांचा सहभाग
प्रास्ताविक प्रदेश अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी केले. सुत्रसंचालन सोमनाथ महाजन यांनी तर आभार जिल्हाअध्यक्ष गजानन महाजन यांनी मानले. यशस्वीतेसाठी गोपाल चौधरी, गजानन चौधरी, रविंद्र माळी, मनोहर महाले, आय.बी.महाजन, क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्था, जानकीनगर, संत शिरोमणी सावता मंडळ अयोध्यानगर, समस्त माळी समजा बहु:संस्था, हरिविठ्ठलनगर, युवयाक्रांती मंच एरंडोल, माळी पंच मंडळ, जोशीपेठ, माळी पंच मंडळ शिरसोली, जोतीबा गृप वंजारीखपाट, माळी पंच मंडळ पिंप्राळश, माळी पंच मंडळ शनिपेठ, पालखी गृप जानकीनगर, संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान, अनमोल मित्रमंडळ जानकीनगर, संत सावता माली स्वयंपाकी मंडळ धरणगाव, सैनी समाज मित्र मंडळ, जळगाव लॉयन ग्रप तळई आदी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.