धुळे । अखिल भारतीय समता परिषदेचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ रतन माळी यांच्या अमानुष हत्येची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी निजामपूर-जैताणे गावात ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून सहाय्यक पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले गोकुळ रतन माळी हे शासकीय कर्मचारी देखील होते. गेल्या 28 जानेवारी रोजी त्यांना जीवंत जाळण्यात आले. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असून माळी यांच्या मारेकर्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीसाठी निजामपूर आणि जैताणे दोन्ही गोकुळ माळींच्या हत्येची चौकशी करा कडकडीत बंदसह पोलिसांना निवेदन गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. यात निजामपूर, जैताणे व्यापारी असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, भामेर ग्रामपंचायत, म्हसाळे ग्रामपंचायत, खुडाणे ग्रामपंचायत, साक्री तालुका शिवसेना, महाराष्ट्र माळी महासंघ, अ.भा.समता परिषद साक्री तालुका, अ.भा.माळी महासंघ धुळे जिल्हा, क्रांतीसुर्य फौंडेशन जैताणे, हनुमान व्यायाम शाळा विजयपूर, जयभवानी सावता मित्रमंडळ जैताणे, सावता माळी मंदीर ट्रस्ट जैताणे, जयशिवाजी व्यायाम शाळा जैताणे यांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला.