जळगाव। माळी समाज श्री संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठानतर्फे आज दि. 27 रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा गुणवंत विद्यार्थ्याचा समाजात उल्लेखनिय कार्य करणार्या मान्यवरांचा सत्कार संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान, जळगाव व समस्त माळी समाज पंच मंडळ जळगाव जिल्हा यांचे संयुक्त विद्यमाने मान्यवराचे उपस्थितीत रविवारी सकाळी 10.30 वाजता लेवा भवन येथे होत आहे. यावेळी प्रमुख वक्ते जयदीप पाटील , तर प्रमुख पाहुणे पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराडे, तहसिलदार अमोल निकम, शिक्षणाधिकारी देविदास महाजन, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, आ. राजूमामा भोळे, उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन संस्थेने केले आहे.