जळगाव : श्री.संत शिरोमणी सावता माळी प्रतिष्ठान व समस्त माळी पंच मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने माळी समाजातील घटस्फोटीत, विधवा, प्रौढ, अपंगत्व असलेल्या उपवर वधु-वर पालक परिचय मेळावा 2017 चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रतिष्ठाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. सदर मेळावा 26 फेबु्रवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता सरदार वल्लभभाई पटेल हॉल, बी.एस.एन.एल. ऑफीस मागे आंबेडकर मार्केट शेजारी करण्याचे ठरविण्यात आले आहे. हा मेळावा समाजातर्फे निशुल्क आयोजित करण्यात आले असून यावेळी जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. मेळाव्यातून परिचय झालेल्या जोडप्यांच्या इच्छेनुसार लग्नाचे प्रायोजन करण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे. मेळावा राज्यस्तरीय असल्याने संपुर्ण राज्यातील माळी समाजबांधव उपस्थित राहणार आहे.