माळी समाज मंडळातर्फे राज्यस्तरीय अधिवेशन

0

धानोरा। येथील क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळद्वारे राज्यस्तरीय 29 वे अधिवेशन अध्यक्ष निळकंठ महाजन यांच्या अध्यक्षते खाली झाले पार पडले. पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पं.स. उपसभापती माणिकचंद महाजन, पं.स.सदस्य कल्पनाताई पाटिल, सरपंच किर्ती पाटिल, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, प्रभाकर चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा झाली व लग्नात अक्षदा ऐवजी फुलांचा वापर करावा, सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग वाढवावा व लग्णाचा आदल्या रात्री डि.जे. वाजवने बंद करावे इत्यादि विषय अधिवेशनात मांडण्यात आले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून अडावदचे सरपंच भारती सचिन महाजन, नगरसेविका संध्या महाजन, जयश्री महाजन, हणुमंत महाजन, सचिन माळी तालुकासह संपर्क प्रमुख महाराष्ट्र, भुषण कुंभार तालुकासह सचिव कुंभार समाज, तालुका कोषाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रंस तसेच समाचे विविध गावातील समाज बांधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तर दुपारच्या सत्रात उपाध्यक्ष नानाभाऊ महाजन खर्ची, सचिव जिवन माळी, सदस्य पुंडलिक चौधरी एरंडोल, शंकर माळी लासुर, योगेश महाजन चहार्डी, भास्कर माळी जळगाव, किशोर महाजन, संगीता माळी मुंबई, प्रेमराज महाजन पिंप्री , सोमा महाजन गांदली, पांडुरंग महाजन यांनी उपस्थिती देवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रास्ताविक किशोर महाजन, सुत्रसंचालन प्रविन माळी व चित्रा माळी यांनी तर आभार माधवराव महाराज यांनी मांडले.