माळी सेनेतर्फे सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय सुरु

0

तळोदा । श्री. संत सावता माळी सेनेतर्फे सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालय सुरु करण्यात आले असून त्याचे उदघाटन काल सायंकाळी माळी समाजाचे अध्यक्ष आय. आर. मगरे व ज्येष्ठ पत्रकार रमेशकुमार भाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तळोदा शहर शिवसेना उपप्रमुख तथा श्री. संत सावता माळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप शेंडे, सुधीरकुमार माळी, उखा पिंपरे, प्रकाश कुलकर्णी, संजय पटेल, राजेश बारोट, शिरीष माळी, किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

वाचनालय सुरु केल्याबद्दल प्रदीप शेंडे यांचे कौतुक
तळोद्यातील श्री. संत सावता माळी भवन जवळ काल सायंकाळी सार्वजनिक वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाटन मान्यवरांचे करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृत्तपत्र वाचनालय सुरु केल्याबद्दल प्रदीप शेंडे यांचे कौतुक केले आणि वृत्तपत्र वाचनालयाचा माध्यमातून समाज परिवर्तनाचे फार मोठे काम त्यांनी हाती घेतले आहे असे गौरवोद्घर यावेळी काढलेत आणि भविष्यात सुद्धा त्यांनी असेच चांगले कार्य करावे अशी अपेक्षा त्यांचा कडून व्यक्त केली. यावेळी पत्रकार राजेश माळी, अविनाश माळी, सुनील सूर्यवंशी, गणेश मराठे, सम्राट महाजन, हेमंत सूर्यवंशी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्र संचालन अविनाश मराठे यांनी तर आभार हेमंत सूर्यवंशी यांनी मानले.