बारामती । राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा सरपंच होणे म्हणजे भाजपने राष्ट्रवादीवर केलेला राजकीय सर्जिकल स्ट्राइक आहे. माळेगावमधील भाजपच्या विजयाची मशाल तेवत ठेवल्यास विधानसभेला कमळ फुलेल, असा विश्वास खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केला. त्यांनी माळेगाव ग्रामपंचायतीला विकासकामांसाठी 25 लाख रुपयांचा निधी जाहीर केला. माळेगाव ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन प्रथमच भाजपचे जयदीप विलासराव तावरे सरपंच झाले. त्यांचा खा. साबळे यांनी सत्कार केला. यावेळी साबळे बोलत होते.
खा. साबळे म्हणाले, माळेगाव ग्रामपंचायतीची सत्ता भाजपकडे आली असून, हे ऐतिहासिक यश आहे. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, सुनील सस्ते, उदय चावरे, प्रशांत सातव यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अशोक सस्ते यांनी केले. आभार धर्मराज पैठणकर यांनी मानले. याप्रसंगी रंजन तावरे, सुनील सस्ते, नगरसेवक विष्णुपंत चौधर, प्रशांत सातव, अशोक सस्ते, अजित तांबोळी, रवींद्र वाघमोडे, शीतल खरात, पल्लवी तावरे, विजयमाला पैठणकर, मंगल लोणकर, ननु तावरे, उदय चावरे, पिनु तावरे, कैलास कारंडे उपस्थित होते.