माळेगाव कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन

0

बारामती: तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन करण्यात आले. कारखान्याचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक चंदरराव तावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे, उपाध्यक्ष तानाजी पोंदकुले यांनी मिल रोलरचे पूजन केले.

माळेगाव कारखाना महाराष्ट्रात पहिल्या तीन साखर कारखान्यात सर्वाधिक उस उत्पादक शेतकर्‍यांना भाव देणारा कारखाना म्हणून नाव लौकीक आहे. या पुढील काळात जास्तीत जास्त भाव कसा देता येईल व उस उत्पादक शेतकर्‍यांना अधिकाधिक सवलती देण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. असे कारखान्याचे अध्यक्ष रंजनकुमार तावरे यांनी जनशक्तिला बोलताना सांगितले. या कार्यक्रमास संचालक मंडळ सदस्य कारखान्याचे सभासद अधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते.