माळेगाव कारखान्याला नाहक बदनाम करण्याचा कट

0

अध्यक्ष रंजन तावरे यांची माहिती; शेतकर्‍यांनी अफवांना बळी पडू नये

बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर वजनकाटा वैदमापन अधिकार्‍यांनी काट्यांची चौकशी केली. यामध्ये वजनमापात कोणताही फरक पडलेला नाही, असे अधिकार्‍यांनी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. मात्र तरीही काहींनी या कारखान्याला बदनाम करण्याचे ठरविले आहे. कारखाना सध्या चांगल्या परिस्थितीत असून गाळप क्षमता वाढलेली आहे. मात्र खोडसाळ पध्दतीने कारखान्याला सतत बदनाम केले जात आहे. मात्र येथील सभासद या गोष्टीला बळी पडणार नाहीत, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष रंजनकाका तावरे यांनी केले. कारखान्याच्या काट्याबाबत अनेकांनी प्रश्‍न उपस्थित केले होते. त्याबाबत माहिती देताना तावर बोलत होते. यावेळी सहकार महर्षी चंदरआण्णा तावरे, कारखान्याचे संचालक विलास देवकाते, माजी संचालक राजाबापू देवकाते आदी होते.

माळेगाव कारखान्याचे सभासद दक्ष…

काटा स्टंपिंग करीत असताना सदर दिवशी दहा टनी जुना काटा मागील बाजूस पाच किलो कमी व पुढील बाजूस पाच किलो जादा असल्याचे आढळले. तोच काटा सेंटरला बैलगाडी उभी केल्यास बरोबर वजन येत होते. त्यामुळे बैलगाडी कशी काट्यावर उभी राहते त्यावर सदरचे पाच किलोचे वजन कमी जास्त होते. शासकीय नियमानुसार 100 किलोला 0.50 ग्रॅम कमी जास्त प्रमाणमध्ये असून त्यामुळे गाडीचे वजन जरी 3800 किलो असले तरी व वजन काटा 10 टनाला कमी जास्त प्रमाण पाच किलो मंजूरी असते. माळेगाव कारखान्याचे सभासद हे दक्ष आहेत. त्यामुळे या बदनामीला सभासद कुठल्याही प्रकारचे महत्व देणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

शेतकर्‍यांकडून प्रत्यक्षरित्या खातरजमा…

कारखान्याच्या बदनामीविषयी आज शेतकर्‍यांनी प्रत्यक्षरित्या खातरजमा केली. काही शेतकर्‍यांनी कृषिउत्पन्न बाजार समितीच्या व इतर खासगी वजनकाट्यावर साखरेच्या पोत्याचे व स्वत:चे वजन केले. यानंतर या शेतकर्‍यांनी कारखान्याच्या वजनकाट्यावर वजन केले. या दोन्ही वजनामध्ये व इतर खासगी या तीनही प्रकारच्या वजन काट्यावर सारखेच वजन भरले, त्यामुळे कारखान्याच्या वजनकाट्यात कोणताही फरक आढळला नाही. असे कारखान्याचे सभासद विठ्ठलराव देवकाते, राजाभाऊ देवकाते, युवराज तावरे, सुर्याजी तात्यासाहेब देवकाते, दादासाहेब केरबा देवकाते, गणेश दत्तात्रेय देवकाते, इंद्रसिंग चुडामन आटोळे, पोपट निगडे, संदिप नामदेव देवकाते या शेतकर्‍यांनी खातरजमा करुन स्पष्ट केले आहे.

चुकीच्या पध्दतीने प्रचार सुरु

माळेगाव कारखान्याच्या काटास्टंपिंगची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. कारखान्याने गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी वैधमापन विभागाकडे काटा स्टंपिंगकरता अर्ज केला होता. त्यासाठी लागणारी वीस हजार तीनशे रुपये अशी फि देखील भरण्यात आली होती. मात्र या काळात या विभागाचे शिंदे यांची बदली झाल्याकारणाने नवीन आलेले अधिकारी योगेश अगरवाल यांनी आपल्या पथकासह कारखान्यास भेट देऊन सर्व वजनांची चौकशी केली. मात्र कोणताही दोष नसल्याकारणाने त्यांनी लेखी स्वरुपात काहीही दिलेले नाही. तरीही कारखान्याच्याविरोधात चूकीच्या पध्दतीने प्रचार सुरु आहे. यामुळे ऊस उत्पादकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी, गेटकेन ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी कारखान्यांला ऊस पुरवठा करु नये, यासाठी हे रचलेले कारस्थान आहे, असे मतही कारखाना प्रशासनाने व्यक्त केले आहे.