बारामती । महाराष्ट्र इंग्रजी डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत देण्यात येणारा पुरस्कार यंदा माळेगाव सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. कारखान्याचे चेअरमन रंजनकुमार तावरे, मेडाचे आयुक्त राजाराम माने, ज्येष्ठ संचालक चंदरराव तावरे, व्हाईस चेअरमन तानाजी पोंदकुले, कार्यकारी संचालक विजय वाबळे, कारखान्याचे सर्व संचालक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ऊस उत्पादकांना उच्चांकीय दर देऊन माळेगाव सहकारी साखर कारखान्याने राज्यात नावलौकीक वाढवला आहे. कमी खर्चात वीज उत्पादन करून स्टीम बचतद्वारे सर्वाधिक 75 गुण मिळवून कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. माळेगाव साखर कारखान्याने सहकारी कारखानदारीला या पुरस्काराच्या निमित्ताने नवी दिशा देण्याचे काम केले आहे. कारखान्याची प्रगती विकासाच्या दिशेने चालू असून येऊ घातलेला सन 2017-18 या हंगामाची पूर्व तयारी कारखान्यात वेगात सुरू आहे. कारखान्याला मिळालेल्या या पुरस्कारामुळे सभासद व कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Prev Post
Next Post