पिंपरी-चिंचवड-लोकसभा निवडणूकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आज शिवसेनेने पालघर वगळता आपल्या 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात मावळमधुन विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे तर शिरुरमधून विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मावळमतदारसंघाचा तिढा कायम होता. आज अखेर तो सुटला आहे. शिवसेनेतूनच श्रीरंग बारणे यांना विरोध होत होता त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता होती. अखेर आज त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.