मावळातील पाच ग्रामपंचायतीचा आणि पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर

0

जनतेतून सरपंचाची निवड; ग्रामपंचायतीवर वर्चस्व दाखवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच

मावळ :- मावळ तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर वडगाव येथे कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष साजरा केला. निवडणूक निकालानंतर कोठेही काही अनुचित घटना घडली नाही. वडगाव मध्ये निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ
निवडणूक पक्षीय चिन्हावर नसल्याने आता सर्वच पक्षांकडून यशाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. सरपंच पदाचे उमेदवार पक्षाचे चिन्ह न घेता जनतेतून निवडून आल्याने ग्रामपंचायतीवर सत्ता नेमकी कुणाची यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. यावरून भविष्यात ग्रामपंचायतींच्या कारभारात राजकीय रणकंदन अपेक्षित असले तरी जनतेतून सरपंच निवडून आल्यामुळे सर्वत्र यशाचा जोरदार जल्लोष करण्यात आला. याबाबत संभ्रमाचे चित्र असले तरी निकालाचा कल पाहिल्यास ग्रामपंचायतीत राजकीय उलथापालथ झाली आहे. निकलादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

जनतेतून सरपंच निवड
सकाळी दहा वाजता महसूल भवनात मत मोजणीला सुरवात झाली. थेट जनतेतून सरपंच निवडून येणार असल्याने वडगाव मावळ येथील महसूल भवनाच्या परिसरात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यापूर्वी मुंढावरे ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायती, सरपंच व सदस्यपदी विजयी झालेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढील प्रमाणे –
1) मुंढावरे ग्रामपंचायत –
प्रभाग -1
वाघमारे कैलास शंकर – 123 मते
कदम चंद्रभागा आप्पा – 142 मते
थोरात पल्लवी प्रमोद – 183 मते
प्रभाग – 2
रणपिसे सागर मल्हारी – 173 मते
बांगर गोरख पोपट – 177 मते
गरवड दिपाली किसन – 170 मते
प्रभाग – 3
जाधव राणी सनी – 171 मते
थोरवे भारती नवनाथ – 153 मते
2) वाकसई ग्रामपंचायत –
सरपंच – काशिकर दिपक नारायण – 1416 मते
प्रभाग – 1
शेळके अनिता अशोक – 391 मते
येवले पुनम प्रदीप – 376 मते
प्रभाग – 2
देसाई पुष्पा सुरेश – 358 मते
कारके आरती प्रकाश – 386 मते
येवले प्रदीप धोंडू – 367 मते
प्रभाग – 3
शिंदे महेंद्र बबन – 378 मते
देशमुख उषा दिलीप – 386 मते
देशमुख गणेश मारूती – 409 मते
3) सांगिसे ग्रामपंचायत –
सरपंच – टाकळकर बबन अर्जुन – 314 मते
प्रभाग – 1
गरूड शोभा सदाशिव – 186 मते
प्रभाग – 2
भांगरे ज्ञानेश्‍वर पांडुरंग – 173 मते
4) भाजे ग्रामपंचायत
सरपंच – मानकर चेतन राम – 792 मते
प्रभाग – 1
विखार मच्छिंद्र वाघू – 225 मते
दळवी गोरक्षनाथ अंनता – 228मते
दळवी सुनिता सुरज – 234 मते
प्रभाग – 2
भालेराव दिलीप नाना – 239 मते
खाटपे अश्‍विनी संतोष – 235 मते
शिवेकर सविता दत्तात्रय – 233 मते
प्रभाग – 3
कुंभार लताबाई बाळासाहेब – 212 मते
काकरे निता धनंजय – 158 मते
ढगे दिनेश गोपाळ – 224 मते
5) लोहगड ग्रामपंचायत –
सरपंच – नागेश बारकू मरगळे – 103 मते
प्रभाग – 2
ढाकोळ गणपत गोविंद – 141 मते
प्रभाग – 3
मरगळे अरूण दगडू – 62 मते
पोटनिवडणुकीत विजयी उमेदवार-
साते – रामदास गोदू शिंदे – 422 मते
आंबी – घोजगे रवींद्र दादू – 151 मते
खडकाळा – शिंदे गजानन शंकर – 755 मते
मळवली – तिकोणे विद्या अनिल – 197 मते
थुगाव – तरस मंगल सुभाष – 175 मते
टाकवे – असवले साधना कैलास – 294 मते