मावळ : रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरया यांच्या वतीने ई-लर्निंग सेट तीन जिल्हा परिषद शाळेत देण्यात आले. त्यामुळे मुलांना घरच्या सारखे शिक्षण मिळणार आहे तसेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होणार आहे. याचा लाभ 5 ते 12 वर्षीय सर्व मुलांना होणार आहे. ई-लर्निंग सेट दिलेल्या शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळा, वाबळेवाडी, जिल्हा परिषद शाळा, असवली, जिल्हा परिषद शाळा, खामगाव मावळ या शाळांचा समावेश आहे.
कामकाजाला प्रारंभ
यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरयाचे अध्यक्ष विलासराव भोसले, संचालक साहेबराव नाईक पवार, शिवाजी दिघे, अमोल शिंदे, विनायक घोरपडे, अमोल भोईटे, संजय सोंडेकर, प्रवीण घोरपडे आदी उपस्थित होते. वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक वारे असवली शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड तसेच खामगाव मावळ शाळेचे मुख्याध्यापक सचिन जाधव यांनी ई-लर्निंग सेट ताब्यात घेतले व लगेच कामकाज सुरू केले. हे सर्व ई-लर्निंग सेट जिल्हा प्रांतपाल 2015-16 रो. सुबोध जोशी यांच्या नेतृत्वाखाली रोटरी क्लब ऑफ चिंचवड मोरया यांच्या वतीने देण्यात आले.