लायन्स क्लबच्यवतीने राबविला उपक्रम
तळेगाव दाभाडे : लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रोपोलिस आणि लायन्स क्लब ऑफ वडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साई, आढले खु., माळेगांव, कल्हाट येथे व प्रतीक विद्या निकेतन, निगडे येथे प्रत्येकी 10 सायकल भेट देऊन पाच शाळांमध्ये लायन्स सायकल बँक सुरू करण्यात आल्या. आमदार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. भरत इंगवले, लायन्सचे प्रांतपाल रमेश शहा व प्रकल्प प्रमुख सुनित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला. गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, वडगांवचे नगरसेवक अॅड.विजयराव जाधव, पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविका आरती चोंधे, पुणे जिल्हा भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष क्रांती सोमवंशी, गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ, प्रसाद पिंगळे, जितेंद्र ठोंबरे, किशोर सूर्यवंशी, जयंत बोंडे ,अनिल केदारी, सतीश गजगे, दीपा जाधव,सुनील जाधव, पद्मजा कदम आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
आमदार भेगडेंनी केले कौतुक
आमदार बाळा भेगडे यांनी आपल्या मनोगतात लायन्स संस्था करत असलेल्या कार्याचे कौतुक केले. सावित्रीच्या लेकींची पायपीट थांबवण्याचे काम लायन्स करीत आहे त्यामुळे पायपीट मुक्त मावळच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे सांगितले. प्रांतपाल रमेश शहा यांनी भविष्यात देखील लायन्स संस्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त सहकार्य करेल अशी ग्वाही दिली. सभापती गुलाबराव म्हाळसकर म्हणाले की, या सायकल कायमस्वरूपी शाळेतच राहणार आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. प्रकल्प प्रमुख सुनित कदम यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रीय समिती सदस्य भूषण मुथा यांनी सूत्रसंचालन केले तर धनंजय धुमाळ यांनी आभार प्रदर्शन केले. जितेंद्र रावल, अमोल मुथा, संतोष चेट्टी, नंदकिशोर गाडे, बाळासाहेब बोरावके, प्रदीप बाफना, झुंबरलाल कर्णावट, आदिनाथ ढमाले, संजय भंडारी, संजय गांधी, दिलीप मुथा, योगेश भंडारी आदींनी नियोजन केले