शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 21 लाख 11 हजार 465 मतदार आहेत. 2027 मतदान केंद्रे आहेत. तर, सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरुर, भोसरी, हडपसर या मतदार संघाचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे कामकाज पाहणार आहेत.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार टप्यात मतदान होणार आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार मतदार संघासाठी तिस-या आणि चौथ्या टप्यात मतदान होणार आहे. पुणे, बारामतीत 23 तर शिरूर, मावळमध्ये 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर, 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. जिल्ह्यात प्रथमच दोन टप्यात निवडणूक होत असल्याने राजकीय नेत्यांना प्रचारासाठी वेळ मिळणार आहे.