मावळ येथील वनजमिनीवर तीन हजार झाडांची लागवड

0

स्वा. सावरकर मंडळाने राबविला उपक्रम

वडगाव मावळः निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने आयोजित केलेल्या विशेष वृक्षारोपण मोहिमेमध्ये कासारसाईजवळील पाचाणे येथील वनजमिनीवर आज 210 निसर्ग मित्र व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे तीन हजारांपेक्षा जास्त बांबूची झाडे लावली. या ठिकाणी महाराष्ट्र शासन वनविभागाने या बारा हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी चर व खड्डे खोदाई पूर्ण झाले आहे. वनविभामार्फत वृक्षलागवड पूर्ण होत आली आहे. वडगाव मावळ वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवलेे यांनी केलेल्या आवाहनानुसार सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने ही मोहीम आयोजित केली होती.

यामध्ये पिंपरी-चिंचवडमधील एम. एम. ज्युनिअर कॉलेज, अमृता विद्यालयम, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय यांचे विद्यार्थी व गजानन राजमाने, शेखर कुलकर्णी, सुभाष गदादे हे अध्यापक सहभागी झाले होते. याशिवाय इंडोसायकलिस्ट क्लब, आवर्तन ग्रुप, ओम निसर्ग ग्रुप, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रम, चला मारु फेरफटका, सावरकर मंडळ महिला विभाग व ग्रंथालयाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वनविभागाचे परिमंडल अधिकारी जी.बी.गायकवाड व वनरक्षक सुनील भुजबळ यांच्या मार्दर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. विजय सातपुते, दीपक पंडित, मनेश म्हस्के, दीपक नलावडे, शैलेश भिडे, सुभाष थोरात, विनीत दाते, राजेश कुंभार,पराग कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी मार्गदर्शन केले. धनंजय शेडबाळे, श्रीकांत मापारी, अजीत पाटील, घुलेसर, दीपक ब्रह्मे, राजेश कुंभार, रोहिदास जाधव, मुक्ता चैतन्य, श्रेया पंडीत आदिंनी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. भास्कर रिकामे यांनी या मोहिमेचे संयोजन केले.