मावळ विधानसभेच्या बुथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पडले पार

0
चांगले कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून प्रशिक्षणाची गरज
भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी यांचे प्रतिपादन
तळेगाव दाभाडे : सध्या राजकार्त्याचा स्तर घसरत चालला असून राजकारणात चांगले कार्यकर्ते निर्माण व्हावे म्हणून कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची जास्त गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते रघुनाथ कुलकर्णी यांनी केले. मावळ विधानसभा मतदार संघातील भारतीय जनात पक्षाच्या ‘बूथ’ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार संजय(बाळा)भेगडे होते. तर व्यासपीठावर नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सुरेखा जाधव, तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, तळेगाव शहर अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे भाजपचे गट नेते शरद बुट्टे पाटील, नितीन मराठे, माजी जिल्हा अध्यक्ष केशवराव वाडेकर, माजी सभापती एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, राजाराम शिंदे, सुकाण बाफना, माऊली शिंदे, अ‍ॅड.रविंद्र दाभाडे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, अ‍ॅड.अविनाश बवरे, यांच्या सह सुमारे चारशे बूथ प्रमुख व कार्यकर्ते या शिबिरास उपस्थित होते.
योजना पोहोचवाव्यात
आता लवकरच लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. बुथ कार्यकर्ता हा सर्वात प्रथम स्तरावरील कार्यकर्ता असतो, जो आपल्या प्रभागाच्या, वॉर्डातील नागरिकांशी संपर्कात असतो. त्यामुळे या बुथ कार्यकर्ताच नागरिकांच्या, मतदारांच्या संपर्कात राहिला पाहिजे.
भारतीय जनात पक्षाचे केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर या शासनाने लोकविकासाच्या अनेक योजना मंजूर करून लोकार्पण केल्या आहेत. या योजना कार्यकर्त्यांनी लोकापर्यंत पोहोचवाव्यात असे कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. तर देशातील शेतकरी, कामगार,महिला,युवक,यांच्यासाठीच्या योजनामधून थेट अनुदान जनाधन आणि जणयोजनामुळे लाभार्थीच्या खात्यात जमा होत आहे.
विश्‍वास निर्माण करावा
सरकारच्या विकास कामाबाबत कार्यकर्त्यांनी जनतेत विश्‍वास निर्माण करावयाला हवा असे मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक श्रीकांत भारती यांनी सांगितले. तर प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेली जबाबबदारी आणि शासनाने लोकोपयोगी केलेली कामे प्रत्येक गावात जनतेला सांगावीत. असे जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार भेगडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे नियोजनासाठी प्रशांत दाभाडे, विनायक भेगडे, रवी माने, भास्कर भेगडे आजी माजी नगरसेवक आदींनी विशेष परीषम घेतले. सूत्र संचालन अविनाश बावरे यांनी केले. आभार बाबूलाल गराडे यांनी केले.