अमळनेर-शहरातील तांबेपुरा भागात मावशीकडे आलेल्या एका चौदा वर्षीय बालिकेचा झोपेतून उठल्यानंतर अचानक मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. कू.हर्षदा भिकन पाटील असे मयत बालिकेचे नाव असून भिकन परबत पाटील रा.निसर्डी यांची ती कन्या होती.
डॉक्टरांनी केले मृत घोषित
तांबेपुरा भागातील गोपाल पाटील हे भिकन पाटील यांचे साडू आहेत. त्यांच्या घरी हर्षदा आईसोबत आली होती.आई व मावशीच्या सोबत ती धाब्यावर रात्री झोपली असता सकाळी उठली व आईला तसेच मावस बहिण कोमल हिला माझे डोके दूखतय असे सांगू लागली. यानंतर तिला खाली आणल्यानंतर तीला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ.संदिप जोशींनी तपासणी अंती तिला मयत घोषीत केले यानंतर अमळनेर ग्रामीप रूग्णालय येथे शवविछेदन करण्यात आले. अचानक घडलेल्या या घटनेने हर्षदा च्या कुटुंबियांना धक्का बसला असून नेमका मृत्यू कशामुळे झाला याबाबत काही समजले नाही.