जळगाव। मासिक ‘लेवाशक्ति’ च्यावतीने लेवा गणबोलीमधील पाच मान्यवर लेखकांच्या सहा पुस्तकांचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी शामसुंदर पाटील, जळगाव पीपल्स्चे अध्यक्ष भालचंद्र पाटील, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, प्राचार्या शोभा नाफडे, मासिक ‘लेवाशक्ति’ व दैनिक ‘जनशक्ति’चे मुख्य संपादक कुंदनदादा ढाके व संपादक शेखर पाटील, तुषार वाघुळदे यांच्या उपस्थितीत पुस्तकांचे प्रकाशन व लेखकांना मानपत्र देवून गौरविले.