मास्कचा वापर सर्वांना अनिवार्य अन्यथा पाचशे रुपये दंड

0

प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी काढले आदेश

फैजपूर : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्यानंतरही नागरीक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने चेहर्‍यावर मास्कचा वापर न करणार्‍यांना आता तत्काळ पाचशे रुपये दंड भरावा लागणार असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी मंगळवार, 13 एप्रिल रोजी काढले आहेत.

निधी मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग होणार
मास्कचा वापर न करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये पाचशे रुपये दंड आकारून हा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे यावल-रावेर तालुक्यातील प्रत्येक नागरीकाने आता मास्क बांधणे अनिवार्य झाले आहे. घराबाहेर पडताना आधी तोंडाला चांगल्या प्रतीचे किंवा घरी बनवलेले धुण्यायोग्य मास्क, पांढराशुभ्र रुमाल प्रत्येकाने बांधावा व कोरोना पासून आपले संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.