नांद्रा । येथून जवळच असलेल्या माहिजी येथील माहिजी देवीचा यात्रोत्सवाला मंगळवार 2 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. गिरणानदीच्या तिरावर नांद्रापासून 5 किलोमिटर अंतरावर असलेल्या माहीजी देवीचा यात्रोत्सव हा खान्देशातील यात्रोत्सवात प्रसिद्ध आहे. ब्रिटिश काळापासून सुरुवात झालेली ही यात्रा 15 दिवस चालते. या यात्रेत जिवनावक्षक वतुचे मोठे, मोठी दुकाने असतात. ब्रिटिश काळात ब्रिटिश येथे कर वसुली करत होते.
देवीची अखाईका
16 व्या शतकात एक वेळसर महीला बोरनार गावाकडुन चिचंखेडा आत्ताचे माहीजी गावाकडे येत होती. काही गुराख्यानी तीला दगड, धोंडे मारत चीडवले. त्या महीलाने मुलांकडे मागे वळुन पाहीले व मुले मुळच्छीत पडली. ही गोष्ट गावकर्यांच्या लक्षात आल्यानंतर तिच्या जवळ जावून झालेल्या प्रकाराबाबत क्षमा याचना करून मृच्छित पडलेल्या मुलांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती केली. गावकर्यांनी केलेल्या विनवणी मान्य करून त्या महीलेने मुलांना जिवनदान दिले. त्यामुळे तेथील गावकर्यांना आनंद झाला आणि ही महिला सर्व सामान्य नसून एक विद्ववान असल्याचे लक्षात असल्यानंत गावकर्यांनी त्या महिलेला भगत समाजाकडे रहावे अशी विनंती केली. त्यानुसार ती महिला गावात राहू लागली. त्यानंतर तिने परीसरात होणार्या लहान सहान आजारपणावर उपचार करु लागली. कालांतराने त्या महीलेने जीवंत समाधी घेतली. मात्र जिवंत समाधी घेण्यापुर्वी तीने गावकर्यांना सांगितले की, माझ्या समाधीवर शेदुंराचे बांध निघतील तेव्हा माझे मंदिर उभारण्यात यावे. महिलेने सांगितल्याप्रमाणे काही दिवसांनी बांध निघाले. त्यानुसार गावकर्यांनी महिलेच्या सांगण्यानुसार मंदिर उभारणी झाली. मंदीर उभारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यानंतर या परीसरात यात्रा भरु लागली. सुरूवातीपासून या यात्रोत्सवात संपूर्ण देशभरातून व्यापारी येथे येत होते. जवळपास बाजारपेठ कोठेही नसल्यामुळे लोक बैलगाडी, पायदळ, यात्रेला चिंचखेडा (माहिजी)गावला जात असतांना ’मायनी’जत्राले चालनु असे सांगत होते. यात ’माय’या शब्दावरून कालांतराने माहिजी देवीची यात्रा म्हणू लागले आणि पुढे गावाचे नाव ही माहीजी झाले. तेव्हापासून माहिजी देवीची यात्रा भरु लागली. लोकनाटय, मिनी पिक्चर टॉकीज, पाळणे, मौत का कुआ, भांड्याचे दुकाने, हॉटेल, खेळणी अशी विविधता असलेल्या यात्रेत मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
नवसाची परंपरा व पालखी सोहळा
चावदस व पौष पौर्णिमेला सकाळी 4वाजता संपूर्ण अंगावर निंबाच्या झाडाचे पत्ते लावुन नवस फेडला जातो. पौर्णिमेला सकाळी 5 वाजता देवीच्या पालखी सोहळा व पादुका पुजनाचा कार्यक्रम होतो. या मंदीर पुजन व देखरेख चिंतामन भगत यांच्याकडे आहे. या यात्रेत पारंपारिक पद्धतीने नवसाची परंपरा आहे. त्यानुसार आपले व्रत पुर्ण करण्यासाठी नवस केला जातो. यात्रेत येणार्या भाविकांसाठी पाचोरा बस आगारातर्फे जादा बसेसची व्यवस्था केली आहे. यात्रेत येणार्या प्रत्येक भाविकाला मातेचे दर्शन होते. परीसरात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या यात्रोत्सवात परीसरातील नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायततर्फे करण्यात आले आहे.