जळगाव । येथील जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी मिलिंद दुसाने यांची अलिबाग-रायगड येथे बदली झाल्याने गुरुवारी 15 रोजी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्यांना निरोप देण्यात आला. दुसाने यांनी गेल्या चार वर्षात जिल्हा माहिती कार्यालयात विविध उपक्रम राबवून जिल्हा माहिती कार्यालय लोकाभिमुख बनविण्यासाठी कार्य केले. माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन त्यांनी माध्यम प्रतिनिधींना जिल्हयातील घडामोडींची माहिती तात्काळ पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या हस्ते दुसाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी विनोद पाटील, प्रविण बावा, श्रीमती उषा लोखंडे, दिलीप खैरनार, प्रमोद भंगाळे, अशोक मोराणकर, पंकज ठाकूर, रविंद्र शिंदे आदि उपस्थित होते.