माहिती अधिकार कार्यकर्ता गुप्ता यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

0

जळगाव । मुंबईतील महिला आमदारांना मोबाईलवर अश्लिल मेसेज पाठविल्या प्रकरणी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार प्यारेलाल गुप्ता (रा.शिवाजी नगर, जळगाव) यांना मंगळवारी मुंबई पोलिसांनी जळगावात येवून ताब्यात घेतले. याबाबत विलेपार्ले मुंबई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

मुंबई येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील महिला आमदारांना 21 फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा वाजता मोबाईलवर एक अश्लिल मेसेज आला होता. त्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विलेपार्ले पोलीस स्टेशनला गु.र.नं 64/2017 भादवि कलम 507, 509, आय.टी.अ‍ॅक्ट 66(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात आमदारांना आलेला मेसेज हा दीपक गुप्ता यांच्या मोबाईल क्रमांकावरुन आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी उपनिरीक्षक विकास पाटील, कॉन्स्टेबल पी.एन.शिंदे व अडकमोल यांचे पथक मंगळवारी सकाळीच जळगाव शहरात आले. या पथकाने जळगावात आल्यानंतर शहर पोलीस स्टेशनला भेट देवून स्टेशन डायरीला रितसर नोंद केली व त्यानंतर गुप्ता यांना पोलीस घरुन पोलीस स्टेशनला आणण्यात आले. यावेळी उपनिरीक्षक पाटील यांनी गुप्ता यांच्या पत्नी ज्योती गुप्ता यांना गुन्ह्याची माहिती देवून तशी नोटीस दिली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गुप्ता यांना रेल्वेने मुंबईला
नेण्यात आले.