धुळे। कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्याचा निर्घृण खून झाला. मारेकरी हे ’सीसीटीव्ही’त कैद झाले असून सर्वच मारेकरी सध्या फरार आहेत. चार दिवस उलटूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. खूनातीन आरोपींची माहिती देणार्या आणि त्यातून आरोपींचा शोध लागल्यास, अशांना 10 हजार ते 50 हजारांचे बक्षीस देण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक संशयितांची छायाचित्रे एम.रामकुमार यांनी जाहीर केले आहे. माहिती सांगणार्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दि.18 जुलैला कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याची निर्घृण हत्या झाली. कसायालाही लाजवेल अशा क्रूर पद्धतीने गुड्ड्याचा खातमा करण्यात आला. जवळपास सर्वच मारेकरी सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या प्रकरणी फारुक फौजी याने दिलेल्या फिर्यादीनुसार विलास गोयर, विजय गोयर, विक्की गोयर, शाम गोयर, राजा उर्फ भद्रा देवर, भीमा देवरे, यांच्यासह दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला.
आरोपींचा शोध सूरु अद्याप नाही यश
गेल्या चार दिवसांपासून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पण, त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यात खूनाची ’क्लिप’ सर्वच ठिकाणी व्हायरल झाली आहे. ती यू-ट्यूबवरही जाऊन पोहोचली आहे. यामुळे शहरातील वातावरण दूषित झाले आहे. विविध स्तरावरुन आरोपींना अटक करण्याचा दबाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने फरार आरोपींवर बक्षीस जाहिर केले आहे. धुळे शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.150/2017 भादवि कलम 302,120 (ब),504, 506,आर्म अॅक्ट 3/25, 4/25 या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती देणार्यांना 10 हजार ते 50 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच माहिती देणार्यांची नावे गुपित ठेवण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी सांगितले आहे. आरोपींची माहिती मिळाल्यास धुळे जिल्हा नियंत्रण कक्ष क्र.02562-288211, 228212, हिंमतराव जाधव मोबाईल क्र.9423985098, निरीक्षक रमेशसिंग परदेशी मो.क्र. 9765882654,निरीक्षक अनिल वडनेरे मो.क्र.9823835211 या क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन अधीक्षक रामकुमार यांनी केले आहे.