माहिती फलक बंधनकारकच

0

महापालिका स्थायी समितीची मंजुरी; विकासकामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळण्यासाठी निर्णय

पुणे : पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून सुरू असलेल्या प्रत्येक कामाचे माहिती फलक आता कामाच्या ठिकाणी लावणे बंधनकराक असणार आहे. हे फलक लावण्याच्या प्रस्तावास महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. नागरिकांच्या करातून महापालिकेचे विकासकामे होत असतात. या कामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी अशाप्रकारचे फलक लावण्यात यावेत, तसेच ही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर सविस्तर प्रसिद्ध करावी, अशा सूचना दिल्याचे मुळीक यांनी सांगितले.

संकेतस्थळावरही प्रसिद्ध करावी

नागरिकांच्या करातून महापालिकेचे विकासकामे होत असतात. या कामांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. त्यासाठी अशाप्रकारचे फलक लावण्यात यावेत, तसेच ही माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर सविस्तर प्रसिद्ध करावी, अशा सूचना दिल्याचे मुळीक यांनी सांगितल.

सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष राहावे

महापालिकेच्या पथ विभागामार्फत सुरू असलेल्या नवीन रस्ते, जुन्या रस्त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, काँक्रिटीकरण, फुटपाथ अशा विविध विकासकामांची व त्या कामाच्या देखभाल व दुरुस्तीसाठीची संबंधित ठेकेदारावर असलेली जबाबदारी याबाबत नागरिकांना माहिती व्हावी व अशा विकासकामांवर लोकप्रतिनिधी व प्रशासनाबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष राहावे, यासाठी कामाच्या ठिकाणी फलक लावण्यात यावेत, असा प्रस्ताव उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिला होता.

माहितीफलकाचा उद्देश काय?

विकासकाम कोणत्या लोकप्रतिनिधीच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले, कामाबाबत कोणत्या अधिकार्‍यावर प्रशासनाने जबाबदारी निश्‍चित केली आहे, कामाचे स्वरूप काय आहे, किती निधीची तरतूद करण्यात आली आहे, खर्चिक रक्कम, वर्क ऑर्डर कधी दिली, काम किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे, प्रत्यक्षात किती दिवसात काम पूर्ण करण्यात आले, कामाचा दर्जा व देखभाल दुरुस्तीसाठी कोणाशी संपर्क साधावा, त्यासाठी आवश्यक सर्वांची नावे, पत्ता, संपर्क कमांक, ईमेल आयडी, महापालिकेचे संकेतस्थळ याबाबतची माहिती प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी फलकाद्वारे प्रसिद्ध करावी, असे प्रस्तावात म्हटले आहे.