माहिती मिळत नसल्याने सभापतींचा अधिकार्‍यांवर रोष

0

शहादा । घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना योजनांच्या अनुदान इतर माहिती मिळत नाही. कार्यालयात बांधकाम अभियंता यांच्या बाबत विचारणा केली तर लोकप्रतिनिधीना उडवाउडवीची उत्तर मिळत असल्याने शहादा पंचायत समिती सभापती दरबारसिंग पवार हे कार्यालयात बसुन बरेच भड्कले होते. कार्यालयात लोकप्रतिनिधी लाभार्थी व अधिकार्‍याच्या समनवय नसल्याने नवनिर्वाचित जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यापुढे आव्हान आहे. येथील पंचायत समिती कार्यालयात संगणक विभागात घरकुल योजनाच्या अनुदानाबाबत लाभार्थी व संघनक कर्मचारी यांच्यात काल दुपारी वाद- विवाद झाला होता. त्यानंतर सायंकाळी प. स. सभापती दरबारसिंग पवार हे बांधकाम कार्यालयात बसले. त्यांनी संबंधित अभियंता जागेवर दिसले नसल्याने चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यास त्याबाबत विचारणा केली. तर रावसाहेब कुठे गेले माहित नाही या प्रती उत्तराने सभापती हे चांगलेच भडकले. आणि त्यांनी कार्यालय डोक्यावर घेत आवाज चढविला. लोकप्रतिनिधी आल्यावर अधिकारी कोठे गेले. योजनाची माहिती देत नाही अशी अवस्था असेल तर जनतेला लाभार्थीना काय उत्तर देत असणार लाभार्थी तासनतास कार्यालयाबाहेर उभा राहतो. अधिकारी कामाचे सर्वेक्षणासाठी जातात तर कुठे जातात कोणते कामाची तपासणी करतात याबाबत थांगपत्ता लागत नाही.

कामचुकार अधिकार्‍यांवर करणार कारवाई
सभापती पवार हे चांगलेच संतापलेले असल्याने कार्यालयात उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी तिथे गराडा घातला. आवारात लाभार्थीनी देखील तेथे गर्दी केली. दुपारीच झालेला वादविवाद नंतर सायंकाळी सभापती पवार यांनी संबंधित सर्वच विभागाचे अधिकारी यांना धारेवर धरले. यापुढे अंगणवाडी, प्राथमिक शाळा, बांधकाम घरकुल योजनासह स्थळी प्रत्यक्ष भेट देउन कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्या कामात कामचुकारपणा आढळल्यास त्यांच्या विरोधात लेखी स्वरूपात कार्यवाही करण्यात येइल असा इशारा दिला. घरकुल लाभार्थी अनुदानाबाबत तपास तसेच कार्यालयात बर्‍याच वेळा आधिकारी उपस्थित रहात नाही. लोकप्रतिनिधी लाभाथ्यार्ंना टोलवा टोलवीचे उत्तरे दिले जातात याबाबत सभापती पवार चांगलेच भडकले होते.