माहिती मिळविण्याची भूक पत्रकारिता शिकविते

0

जळगाव। माहिती मिळविण्याची भूक तुम्हाला पत्रकारिता शिकविते, तुम्हाला पत्रकारितेत्त टिकविते आणि त्यातून तुम्ही पत्रकारितेत यशस्वी होतात, असे मार्गदर्शन पत्रकार मनोज बारी यांनी विद्यार्थ्यांना केले. मू.जे.महविद्यालयातील जनसंवाद आणि वृत्तविद्या विभागात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि जेष्ठ पत्रकार मनोज बारी यांचे व्याख्यान शनिवारी घेण्यात आले. मंचावर विभागप्रमुख प्रा. विश्वजीत चौधरी, समन्वयक दिलीप तिवारी, राजेश यावलकर, प्रवीण चौधरी उपस्थित होते. यावेळी ज्योती रामोळे, रवींद्र स्वामी, सुमित देशमुख या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांनी केला.

‘ वृत्तपत्र निर्मिती आणि संपादन ’ याविषयी विद्यार्थ्यांना सखोल व सविस्तर मार्गदर्शन मनोज बारी यांनी केले. ते म्हणाले की, माध्यमांमधील ताकद पूर्वी वृत्तपत्रांपर्यंत मर्यादित होती. ती आता विभागली गेली आहे. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सामान्यज्ञान, भौगोलिक ज्ञान अवगत हवे. वृत्तपत्रात जोखीम स्वीकारून काम करावे लागते. अनुभवाने, स्वानुभवाने शिकले तर बदलत्या नवमाध्यमांच्या युगात तुम्ही टिकून राहाल असे सांगत विद्यार्थ्यांशी त्यांनी प्रश्नोत्तरानेही संवाद साधला. यावेळी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रस्तावना परमेश्वर थाटे, सूत्रसंचालन ज्योती रामोळे यांनी तर आभार गोपाल मराठे यांनी मानले.