नवी दिल्ली। भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व माही हा आजही आपल्या चाहत्यांवर प्रेम करणार आहे.कर्णधार पद सोडले कसोटी क्रिकेट खेळणे सोडले तरी सुध्दा माहीचे चाहत्याचे प्रेम त्याच्यावर काही कमी झालेले नाही. याचे प्रत्यय विजय हजारे ट्राफीच्या उप-उपांत्य सामन्यादरम्यान पाहायला मिळाली आहे.धोनी फलंदाजी करत असताना माहीचा चाहता त्याची स्वाक्षरी घेण्यासाठी थेट मैदानावर आला.त्यावेळी धोनी फलंदाजी करत होता.
सुरक्षा रक्षकांना दिला चकवा
विजय हजारे ट्राफीच्या उप-उपांत्य सामना झारखंड विरूद्ध विदर्भमध्ये सुरू होता. या सामन्यात धोनी नॉन-स्टाइकला फलंदाजी करताना होता. अचानक एक चाहता सुरक्षारक्षकांना चकवत धोनीजवळ आला. त्याने धोनीच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने धोनीकडे सही मागितली. धोनीनेही त्याला निराश केले नाही आणि सामना सुरू असताना धोनीने त्याला स्वाक्षरी दिली. मैदानात सामना सुरू असतांना आलेल्या चाहत्याला स्वाक्षरी मिळाल्यानंतर त्याचा आनंद बघण्यासारखा होता. जावेनारी महिन्यातही भारत अ आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या सराव सामन्यातही एक चाहता धोनीला भेटायला मैदानात आला होता. एकदा कसोटी सामन्यादरम्यान अब्बास अली बेग यांना एका चाहत्याने किस केले होते तर एखदा सुरक्षा रक्षकांचे कडे चुकवून एक चाहता सौरव गांगुलीच्या पाया पडण्यासाठी मैदानात पोहोचला होता. यापुर्वी काही दिवसांपूर्वी धोनी आपल्या मित्रांसोबत ड्रेसिंग रुममध्ये विजय साजरा करत होता. त्यावेळी अचानक त्याची नजर एका चेह-यावर जाऊन थांबली. रेल्वेत नोकरी करत असताना ओळख झालेल्या आपल्या या मित्राला ओळखण्यात धोनीला क्षणाचाही वेळ लागला नाही.