नवी दिल्ली। क्रिकेटच्या मैदानात सर्वांचीच मणे जिंकणारा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा खोवला असून धोनीने क्रिकेटच्या मैदानानंतर व्यावसायिक जगातही कर्णधारी भूमिका साकारली. ‘गल्फ ऑईल इंडिया’ कंपनीचा एका दिवसाचा मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) होण्याचा सन्मान धोनीला देण्यात आला. धोनी लवकरच आयपीएलच्या धर्तीवर रायझिंग पुणे सुपरजाएंट्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. दरम्यान, धोनी आता बऱयाच कालावधीनंतर चाहत्यांना खेळताना दिसणार आहे. कसोटीतून निवृत्ती स्विकारल्यानंतर धोनीला गेल्या काही महिन्यांमध्ये आराम मिळाला.
त्यामुळे धोनीला आपल्या कुटुंबियांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतित करता आला. पण त्याचवेळी धोनी स्थानिक सामन्यांत झारखंड संघाकडून खेळतानाही पाहायला मिळाला. आयपीएलनंतर धोनी थेट आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत टीम इंडियाकडून खेळताना पाहायला मिळेल.