माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
पिंपरी चिंचवड : माहेरहून पैसे घेऊन येण्याची मागणी करत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना विवेक वसाहत, केशव नगर, चिंचवड येथे 4 फेब्रुवारी 2014 पासून रविवार (दि. 4 डिसेंबर, 2018) या कालावधीत घडली. याप्रकरणी 28 वर्षीय विवाहितेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती प्रसाद चंद्रकांत कंग्राळकर आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा आरोपी प्रसाद याच्याशी 4 फेब्रुवारी 2014 रोजी विवाह झाला. त्यानंतर प्रसाद आणि त्याच्या आईने विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. फिर्यादी यांनी पैसे न आणल्याने त्यांना वारंवार शिवीगाळ करत मारहाण केली. लहान मोठया कारणावरून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण करत त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. यावरून पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.