माहेरुन पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

0

चाळीसगाव । शाळा अप्रोव्हल साठी माहेरून 8 लाख रुपये आणावेत म्हणून चाळीसगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणार्‍या धुळे येथील पती, सासु, नणंद यांचे विरोधात व विनयभंग करणार्‍या सासर्‍या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे येथील प्रमोदन नगर येथील सोनल कुणाल पाटील (वय 24) याने फिर्यादीत लग्न झाल्यानंतर 2 महिन्यानंतर सासरे कडील मंडळींनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केले असल्याचे म्हटले आहे.

सासर्‍या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
सासरे अशोक नथाजी पाटील यांची धुळे येथे चैत्यन विद्यामंदिर नावाची शिक्षण संस्था आहे. या संस्थेत त्यांची सासू चेअरमन तर पती कुणाल हे मुख्याध्यापक आहेत. शाळा अप्रोव्हलसाठी त्यांनी माहेरुन 8 लाख रुपये आणावेत म्हणून पती कुणाल अशोक पाटील, सासरा अशोक नथाजी पाटील, सासू पुष्पा अशोक पाटील हे त्यांचा शारीरिक व मानसिक छळ करीत करतात. नणंद योगेश्वरी जगदीश गरुड, हर्षदा राजा अय्यर या दोन्ही फोनवरुन त्रास द्यायला सांगत असल्याची तक्रार आहे. सास व पती बाहेर असतांना सासर्‍याने अश्लील भाषेत बोलून विनयभंग केला. ही बाब पती व सासू घरी आल्यानंतर सांगितली असता उलट त्यांनी मारहाण करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने (स्त्रीधन) काढून घेऊन घरून निघून जा व माहेरून 8 लाख रुपये आणल्याशिवाय घरी येऊ नको असा दम देऊन हाकलून दिले असे म्हटले आहे. या प्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवि कलम 498( अ) 354, 406, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा धुळे पोलीस स्टेशन ला वर्ग करण्यात येणार आहे.