शहादा । किराणा दुकाणासाठी एक लाख रूपये आण अन्यथा तुला घरात घेण्यार नाही तसेच स्वयंपाक येत नाही असे किरकोळ कारण पुढे करत पीडित महिलेने पतीसह सहा जणाविरूद्ध शहादा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.सुनिता हिमंत सोनवणे (वय 20) रा.लामकणी हिचा विवाह लोणखेडा येथिल हिम्मत दिलीप सोनवणे रा.आझाद नगर याच्याशी 13 मे 2015 रोजी विवाह झाला. पती हिंमत सोनवणे हे सुतगिरणी येथे कामास आहेत. गेल्या दिड वर्षा पासून पती यांनी माहेरून एक लाख रू.किराणा दुकान टाकण्यासाठी आण असा वारंवार तगादा लावला. पतीसह सासु सासरे व इतरांनी स्वयंपाक येत नाही, कपडे धुता येत नाही, व शिवीगाळ मारठोक केली. माहेरून रक्कम आणली नाहि तर तुला घरात घेणार नाहि अशी दमदाटी करून पती हिंमत याने दुसरे लग्न करून घेईल अशी धमकी दिल्याने सुनिताबाई हिंमत सोनवणे यांनी शहादा पोलीसात पती हिंमत सोनवणे, दिलिप राजाराम सोनवणे (सासरे),वत्सलाबाई सोनवणे (सासू),राजाराम महारू सोनवणे (आजे.सासरे), शांताबाई सोनवणे (आजे.सासू)व भगवान सोनवणे (दिर) या सहा जणाविरूद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.