चाळीसगाव । उन्हाळ्यात पाणी देण्याची व्यवस्था अनेक ठिकाणी केली जाते. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून चाळीसगाव शहरातील माहेश्वरी महीला मंडळाच्या सदस्यांच्या वतीने पांथस्थांना शीतपेय वाटप करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. उन्हाळ्यात उन्हाची तीव्रता जशजशी वाढू लागते, तसतसे थंडपेयांच्या दुकानाकडे आपले पाय वळू लागतात.
शीतपेय वाटपासाठी अनेकांची उपस्थिती
दूरदर्शनवरून होणारा जाहिरातींचा मारा आणि त्यांची चटकदार चव यामुळे कृत्रिम शीतपेयांची मागणी देखील आपोआप केली जात असते, परंतू नैसर्गिक स्वरूपाची शीतपेये घेतल्यास ती पोषण करणारी, थंड, शरीराची उष्णता कमी करणारी असतात. रस्त्यावरील वाटसरु असो वा कामानिमित्त तहसिल पोलीस स्टेशन कार्यालयात आलेले पांथस्थ या सर्वांना असह्य उन्हाचा फटका बसू नये म्हणून शीतपेय वाटप करण्याचे यावेळी महीला सदस्यांनी सांगितले. यावेळी सुमन बंग, ज्योती करवा, किरण कळंत्री, सुहासिनी बंग, सरला लढ्ढा, कल्पना जागेटीया, अनिता मुंदडा, पदमा माहेश्वरी, मंजूषा बंग, सरला करवा आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.