एरंडोल । तालुका माहेश्वरी महिला संघटनच्या वतीने महेश नवमी निमित्त मारवाडी गल्लीत थंडगार नागरिकांना शितपेयाचे वाटप करण्यात आले. महिला मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. यावर्षी वाढत्या तापमानामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला.दुपारच्या वेळेस नागरिक शहरात असलेल्या सार्वजनिक पाणपोयांवर पाणी पिण्यासाठी गर्दी करीत होते.
शहरातील गरजूंनी घेतला लाभ
गोरगरीब नागरिकांना देखील थंड शीतपेयाचा आनंद मिळावा या हेतूने माहेश्वरी महिला संघटनच्या वतीने माहेश्वरी समाजात अत्यंत महत्व असलेल्या महेश नवमीच्या दिवशी मारवाडी गल्लीत सर्वसामान्य नागरिकांना शितपेयाचे मोफत वाटप करून नवीन आदर्श निर्माण केला. शेकडो नागरिकांनी शीतपेयाचा लाभ घेतला. यावेळी महिला संघटनच्या प्रदेशाध्यक्ष विजया जाजू, तालुकाध्यक्ष मिना मानुधने, सचिव विद्या काबरा, मंगला बाहेती, संगीता मणियार, मीरा जाखीटे, अर्चना लढ्ढा, संगीता सोनी, कल्पना शर्मा, नीलिमा मानुधाने, डॉ.उज्वला राठी, भारती बियाणी, डॉ.राखी काबरा, शीतल पांडे यांचेसह महिला संघटनच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.